*तू हवी..........* रणरणत्या उन्हामधे सळसळत्या पानांमधे चकमकत्या चांदण्यात हृदयाच्या स्पंदनात... फनफनत्या तापामधे सुख-दुखाच्या जपामधे मित्रांच्या संगतिला वैर्यांच्या पंगतिला... अडखळत्या रत्यात निर्जन वस्त्यात गड़गड़त्या नभात सलसलत्या वेदनांत.. वृक्षांच्या छायेत अर्धांगिणीच्या मायेत् सहृदयी स्वभावात आठवणींच्या गावात ✍️ *अतुल एस. दुर्गे*
Posts
Showing posts from March, 2020
बा भीमा ये पुन्हा
- Get link
- X
- Other Apps
*बा भीमा ये पुन्हा* कसा लढला त्या आंधळ्या समाजाशी.. एकटा पुरुण उरला त्या धर्मांध गिधाडांशी.. कोणी नव्हतेच् मार्गदाते.. वाट दावायला पाठीशी.. सज्ज झाला ज्ञानाने.. भांडण्या तू सवर्णांशि... लय उपकार केलेस तू दिन दूबळ्या कवटाळुनी छातीशी... तू पहिलाच होतास भीमा ज्यांनी कुरुवाळले मायेच्या स्पर्शानि.. पानी नव्हतेच नशिबि अमृत पाजले विचारांनी.. आज विभागलो गटागटात शिरजोर झाले वैरी चहुबाजुनि... शिकार केलि रे तुझ्या पिलांची त्या लांडग्यांच्या कळपांनी.. तुझ्या रथाला तिथेच थांबविले... स्वार्थी झाले पोटापाण्याच्या प्रश्नांनी.. बुद्ध दिलास आम्हा तू पुढे जान्या स्वयंप्रकाशानि.. ये पुन्हा तू पुन्हा एकदा वाट पाहतो साश्रु नयनांनी.. *अतुल एस.दुर्गे*