Posts

नवक्रांतीचे अग्रदूत: रणजितसिंह डीसले

  जागतिकीकरणाच्या युगात ओस पडू लागलेल्या मराठी शाळा, पालक वर्गाचा मराठी शाळा व मराठी माध्यमातून देण्यात येणारे शिक्षण याकडे बघण्याचा दृष्टिकोन यामुळे धनदांडग्यांच्या इंग्रजी शाळांचे वाढते महत्त्व या सार्‍या बाबींचा विचार केला असता, महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेचे प्रयोगशील शिक्षक रणजितसिंह डीसले यांना नुकताच ग्लोबल टीचर हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा नवक्रांती च्या आरंभाचा सुवर्ण क्षण म्हणावा लागेल. सरकारी शाळेतील शिक्षकाचा जागतिक सन्मान यातून व्यवस्था परिवर्तनाचा नवा अध्याय निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मराठी शाळांचे शिक्षक व पालक यांच्यात नवचेतना निर्माण होईल व भविष्यात मराठी शाळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्की बदलेल असा सार्थ विश्वास वाटतोय.आपल्या पाल्याने केवळ इंग्रजी माध्यमातून शिक्षण घ्यावे हा अट्टाहास  त्याला कारणीभूत अधिकाधिक सुविधांचे प्रलोभन, इंग्रजीचा प्रभाव, दिखाऊपणा ची उच्च परंतु बेगडी शिक्षणप्रणाली हे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वाढते प्रस्थ यास जबाबदार घटक मानता येतील. मराठी शाळा टिकविण्याचे आव...
*मैत्री* मैत्री हा वाचायला अगदी लहान वाटनारा पण आयुष्याला अर्थ देणारा महान शब्द...मैत्री ला नसतात बन्धने जाती, धर्म, वय,समाज, प्रान्त,भाषा,पैसा, संपती ईत्यादीं ची...मैत्री ही माणसाची मानसाशि, प्राण्याची प्राण्याशी इतकेच नव्हे तर निसर्गाशी एकांतवासाशि आणि पुस्तकांशी पण होते..मैत्री ची व्याख्या शब्दात तरी शक्य नाही...या शब्दाच सामर्थ्य इतके आहे...क्षितिजाच्या पल्याड... भाग्यवन्त असत्तात् ती माणसे ज्यांना खरे मित्र मिळतात.. माझ तर आयुष्य मित्रांनी आकार दिलेलआहे... जीवनाच्या प्रत्येक वाटेवर त्यांची सोबत,मला घडवन्यात मोलाची ठरली... असाच एक जीवलग मित्र्...राहुल कांबळे मैत्री च्या दुनियेतील सच्चा सम्राट ज्यानी अनेकांच्या मनावर राज्य मिळवन्याची दैवी शक्ति जनु जन्मजात मिळवली...या व्यक्तीच्या आयुष्यात आई वडीला नंतर सर्वात आधी येतात मित्र्....सर्वांच्या मदतीला धावून जाणारा..एक हाक दया तो हजर...वाट्टेल ती मदत सहकार्य करण्यास सदैव तत्पर.... आजच्या ऐहिक सुखाच्या  मागे धावणार्या जगात अशी माणुसकी जीवन्त ठेवनारि व् दिलदार मनाची माणसे फार थोडीच्...पूर्णपणे निस्वार्थ...कुठल्याही अपेक्षेवीणा मद...
*तू हवी..........* रणरणत्या उन्हामधे  सळसळत्या पानांमधे चकमकत्या चांदण्यात हृदयाच्या स्पंदनात... फनफनत्या तापामधे सुख-दुखाच्या जपामधे मित्रांच्या संगतिला वैर्यांच्या पंगतिला... अडखळत्या रत्यात निर्जन वस्त्यात गड़गड़त्या नभात सलसलत्या वेदनांत.. वृक्षांच्या छायेत अर्धांगिणीच्या मायेत् सहृदयी स्वभावात आठवणींच्या गावात ✍️ *अतुल एस. दुर्गे*

बा भीमा ये पुन्हा

*बा भीमा ये पुन्हा* कसा लढला त्या आंधळ्या समाजाशी.. एकटा पुरुण उरला त्या धर्मांध गिधाडांशी.. कोणी नव्हतेच् मार्गदाते.. वाट दावायला पाठीशी.. सज्ज झाला ज्ञानाने.. भांडण्या तू सवर्णांशि... लय उपकार केलेस तू दिन दूबळ्या कवटाळुनी छातीशी... तू पहिलाच होतास भीमा ज्यांनी कुरुवाळले मायेच्या स्पर्शानि.. पानी नव्हतेच नशिबि अमृत पाजले विचारांनी.. आज विभागलो गटागटात शिरजोर झाले वैरी चहुबाजुनि... शिकार केलि रे तुझ्या पिलांची त्या लांडग्यांच्या कळपांनी.. तुझ्या रथाला तिथेच थांबविले... स्वार्थी झाले पोटापाण्याच्या प्रश्नांनी.. बुद्ध दिलास आम्हा तू पुढे जान्या स्वयंप्रकाशानि.. ये पुन्हा तू पुन्हा एकदा वाट पाहतो साश्रु नयनांनी.. *अतुल एस.दुर्गे*